पुणे : ‘भगवानगडाचे महंत ह. भ. प. नामदेव महाराज शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि वाल्मीक कराड गँगशी संबंध यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका मांडली असून, ही बाब सगळ्या वारकरी संप्रदायासाठी लाजिरवाणी आहे. त्यांनी याबाबत लवकरात लवकर वारकरी संप्रदायाची माफी न मागितल्यास राज्यभरात आंदोलन करू,’ असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल आबा मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

‘संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांची मानसिकता अशी का बनली हे देखील पाहिले पाहिजे, असे विधान नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यावरून शास्त्री हत्येचे समर्थन करतात का? दोन समाजांना समोरासमोर लढा, असे सांगणे भगवानगडाच्या महंताला शोभते का,’ असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला.

Story img Loader