राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना पुण्यात घडली. माध्यमांशी बोलत असतानाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : नामदेव जाधव जिजाऊंचे वंशज नसल्याचा राजे लखोजीराव जाधव यांच्या वंशजांचा दावा; रोहित पवारांकडे चौकशीची मागणी

शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केल्याने पवार समर्थकांकडून विरोध

नामदेव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करीत होते. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. तसेच त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला. यानंतर भांडारकर संस्थेने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द केला. त्याच दरम्यान नवी पेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या चेहर्‍याला काळे फासले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar supporter throw ink on namdev jadhav in pune svk 88 pbs