विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केल्याच्या राग मनात ठेवून दहा ते १३ जणांनी तरुणावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तरूणाला १७ टाके पडले आहेत. सुमित बाबर (वय ३७, रा. कोंढवा खुर्द) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील महादेव बाबर यांच्या कार्यालयाजवळ बुधवारी रात्री आठ वाजता घडली.  या प्रकरणी आठ जण ताब्यात घेण्यात आले आहेत. अद्याप पाच जणांचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागात शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या कार्यालया जवळ काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवसेनाचा कार्यकर्ता सुमित बाबर हा बसला होता. त्यावेळी शिवसेनेमधील दहा ते १३ जण स्थानिक कार्यकर्ते सुमितजवळ आले. त्याला विचारले की, निवडणुकीच्या दरम्यान तू फेसबुकवर राष्ट्रवादीच्या पोस्ट का शेअर केल्या. असा जाब विचारत, सुमीतला बेदम मारहाण केली. यामध्ये सुमितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सतरा टाके पडले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू असून या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पाच जणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp social media post shivsena vidhansabha election attack nck
Show comments