Pune Samadhan Chowk viral Video: पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आणि त्यानंतर जमलेल्या लोकांनी काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांना ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले आहे. मात्र या घटनेवरून आता विरोधकांनी महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट टाकून मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सदर घटनेचा व्हिडीओ शेअर करून सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या स्मार्ट सिटीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, “स्मार्ट सिटी म्हणतात ते हेच का मुख्यमंत्री महोदय? पुणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गायब होतो. ही घटना अतिशय भयंकर आणि रस्त्याच्या एकंदर दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची ठाम मागणी आहे.”

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
car accident video | car hits woman distracted by phone
थरारक अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Video : Pune Traffic Surg
Pune Video : “नॉन पुणेकर परतले!” पुण्यातील ट्रॅफिक वाढलं, VIDEO होतोय व्हायरल
Dolly chaiwala viral videos
‘डॉली चायवाल्या’ने चक्क दुबईमध्ये थाटले नवे ऑफिस; Video पाहून युजर म्हणाला, “डिग्रीला आग…”
dsp meets vegetable vendor friend in bhopal
१४ वर्षांनंतर डीएसपींनी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले आणि गळाभेट घेतली; भावनिक Video व्हायरल!
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल

दरम्यान सोशल मीडियावरही या दुर्घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेकांनी सरकारला धारेवर धरले आहे. “मुळा मुठा सारखी गटारं असून सुद्धा, विकासाची गंगा पुण्यातून वाहते..!”, अशी प्रतिक्रिया एक्सवर एका युजरने दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने पुण्याचे शिल्पकार कुठे गेले, पुण्याचा विकास बुडालाय, अशी कमेंट केली आहे.

हे वाचा >> पुणे : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना

अग्निशामक विभागाने काय सांगितले?

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात चार वाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचा ट्रक ड्रेनेज लाईन सफाई करण्यासाठी आला होता. त्यावेळी चालकाने ड्रेनेज लाईनपासून काही अंतर ट्रक पुढे घेऊन पुन्हा मागे घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जागेवरच भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे जवळपास ४० फुट खोल खड्ड्यात ट्रक पडला आणि बाजूच्या दोन दुचाकी देखील खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या. ट्रक खाली जात असल्याचे लक्षात येताच, चालकाने बाहेर उडी मारून जीव वाचविला. क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

विहिर बुजवून रस्ता केला होता?

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला असता ते म्हणाले की, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट या इमारतीच्या परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ड्रेनेज लाईन साफसफाई करण्यासाठी महापालिकेचा ट्रक आला होता. त्यावेळी ट्रक उभा असलेल्या जागेचा भाग खचून ट्रक पूर्णपणे खड्ड्यात गेल्याची घटना घडली. त्यानंतर दोन क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले आहे. पण त्यानंतर खड्डा पडलेल्या भागाची पाहणी केल्यावर विहिरीच्या खुणा दिसत आहे. काही वर्षांपूर्वी त्या जागेवर बांधकाम करून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते. आज त्याच जागेवर ट्रक थांबविण्यात आला होता आणि त्या ट्रकचे वजन अधिक असल्याने पेव्हर ब्लॉक खचले. त्यामुळे क्षणात ट्रक पूर्णपणे खड्ड्यामध्ये गेल्याची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.