पिंपरी : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून लढेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने पिंपरी-चिंचवडमधील विद्यमान लोकप्रतिनिधींनी सुटकेचा श्वास सोडला आहे. लोकसभेला मावळची जागा शिंदे गट, विधानसभेला पिंपरी आणि मावळची जागा अजित पवार गट, तर चिंचवड आणि भोसरीची जागा भाजपकडे राहू शकते. त्यामुळे जागा वाटपांचा समतोल राखला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. पिंपरी, चिंचवडचा मावळ तर भोसरीचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. आता अजित पवार यांचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. शहर राष्ट्रवादीनेही पवारांना साथ दिली. त्यातच पवार यांनी महायुती म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ज्या पक्षाचे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. त्याच पक्षाकडे जागा कायम राहतील अशी चिन्हे आहेत.

हेही वाचा… “शरद पवारांनी दोनदा पंतप्रधान होण्याची संधी घालवली, आता त्यांनी रिटायर्ड…”, सायरस पूनावालांचा सल्ला

मागीलवेळी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मावळमधून पराभव केला. आता बारणे शिंदे गटात आहेत. मावळ शिंदे गटाकडे कायम राहण्याची चिन्हे असून त्याबदल्यात चारही विधानसभा मतदारसंघांवरील दावा शिंदे गटाला सोडावा लागणार आहे. पिंपरीतून दोनवेळा राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी झाले असल्याने पिंपरीची जागा पवार गटाकडेच राहील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार ठाकरे गटात आहेत. त्यामुळे बनसोडे-चाबुकस्वार यांच्यात पुन्हा लढत होऊ शकते.

हेही वाचा… “उद्धव ठाकरे हे आमचे वकील, त्यांनी आमची…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

मावळचे आमदार सुनील शेळके हे पवार यांच्यासोबत आहेत. ती जागाही पवार गटाकडेच राहील. तिथे भाजपला दावा सोडावा लागण्याची शक्यता आहे. चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप तर भोसरीतून महेश लांडगे निवडून आले आहेत. त्यामुळे या दोनही जागा भाजपकडेच राहू शकतात. त्यामुळे पोटनिवडणुकीत लाखभर मते घेतलेल्या चिंचवडवर पवार गटाला पाणी सोडावे लागले, अशी चर्चा आहे.

हेही वाचा… “अजित पवारांना योग्य वेळी…”, रामराजे नाईक निंबाळकरांचं सूचक वक्तव्य!

महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला पुन्हा सत्ता आणायची आहे. तर, अजित पवार यांनाही महापालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. महायुतीत एकत्र असलेल्या दोनही पक्षांनी १०० हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यातच पवार यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवणुकीत महायुतीत नुरा-कुस्ती होण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp withdraw claim on chinchwad and bhosari assembly constituency election pune print news ggy 03 asj
Show comments