पुण्यात सातत्याने होणारे रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि अन्य विकासकामांमुळे वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत आत्तापर्यंत ४५९ वृक्ष कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे शहरात आग लागण्याच्या घटनांपेक्षा झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाढत्या काँक्रिटीकरणामुळेच झाडे कोसळण्याच्या घटना घडत असल्याची कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे ‘रिंग रोडचे भवितव्य खासगी जागा मालकांच्या हातात; एकूण १७४० हेक्टरपैकी १६०१ हेक्टर खासगी जागा

सार्वजनिक जागांवरील झाडांभोवती काँक्रिटीकरण केले जात आहे. पेव्हर ब्लाॅकचाही वापर केला जात आहे. झाडांभोवती झालेल्या बांधकामांमुळे मातीचे आवरण नष्ट होत असून चुकीच्या पद्धतीने आणि अशास्त्रीय पद्धतीने होणारी छाटणीही झाडे पडण्यास कारणीभूत असल्याचे निरीक्षण पुढे आले आहे. सततची रस्ते खोदाई, झाडांभोवती पाणी साचणे असे प्रकारही झाडे उन्मळण्यास जबाबदार ठरत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांसह सोसायटींच्या मालकीच्या अंतर्गत रस्त्यांवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण झाले आहे. अनेक भागात, झाडाच्या खोडाभोवती माती उरलेली नाही. त्यामुळे झाडांची वाढ खुंटत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत अशी झाडे कोसळतात, असे महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी सांगतिले. विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी करण्यात आलेली सततची खोदाई, भूमिगत वाहिन्यां टाकताना झाडांच्या मुळांना हानी पोहोचत असल्यानेही त्याचा परिणाम वृक्ष कोसळण्यात होतो, असेही घोरपडे यांनी स्पष्ट केले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांच्या कार्यकाळात उद्यान विभागाने पथ विभागाला एक परिपत्रक दिले होते. त्यामध्येही झाडांजवळील काँक्रीटीकरणामुळे झाडे पडण्याच्या घटना वाढत असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र पथ विभागाकडून उद्यान विभागाच्या सूचनेला केराची टोपली दाखविण्यात आली. नगरसेवकांकडून स्थानिक प्रभागात विकास निधीचा वापर करून रस्ते काँक्रिकीटकरणाची कामे केली जातात. जवळपास तीनशे कोटींहून अधिक रुपयांचा खर्च काँक्रिटीकरणावर होतो. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे झाडांची तग धरण्याची क्षमता कमी झाली आहे.

हेही वाचा- उड्डाणपूल पाडण्यापूर्वीच स्थानिकांत संभ्रमांचे ‘स्फोट’; चांदणी चौकाजवळच्या रहिवाशांना कोणत्याही सूचना नाहीत

दरम्यान, पथ विभागाने मात्र हा दावा खोडून काढला आहे. अशास्त्रीय पद्धतीने होत असलेली वृक्षांच्या छाटणीमुळेच झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काँक्रिटीकरण करताना झाडांच्या नैसर्गिकवाढीसाठी पुरेशा जागा उपलब्ध करून देण्याची खबरदारी पथ विभागाकडून घेतली जाते, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

चौकट वृक्ष कोसळण्याच्या घटना

वर्षसंख्या २०१० ५६७ २०११ ४४० २०१२ ४२० २०१३ ६९० २०१४ ६८० २०१५ ८२१ २०१६ ८१८ २०१७ १२०१ २०१८ ९३६ २०१९ १२६९ २०२० ११५२ २०२१ ६९५ २०२२ ४५९ (सप्टेंबर अखेरपर्यंत)