बारावीत शिकत असलेले अथवा बारावी उत्तीर्ण झालेले आणि ज्यांचा जन्म २ जुलै १९९६ नंतरचा आहे, असे युवक राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील मुले अर्ज करण्यास पात्र असून त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.
संपूर्ण देशभरात १९ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून राज्यात मुंबई आणि नागपूर येथे ही परीक्षा घेण्यात येते. २ जानेवारी २०१६ पासून सुरू होणाऱ्या एनडीएच्या २३५ व्या तुकडीसाठी तसेच नेव्हल अॅकॅडमीच्या ९७ व्या तुकडीसाठी अर्ज करण्याची २३ जानेवारी ही अंतिम तारीख आहे. एनडीएसाठी ३२० जागा तर नेव्हल अॅकॅडमी प्रवेशासाठी ५५ जागा आहेत. यासंदर्भात मोफत सल्ल्यासाठी घोले रस्त्यावरील महात्मा फुले वस्तू संग्रहालय आवारातील अॅपेक्स करिअर (दूरध्वनी क्र. २५५३३९७७) कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांनी केले आहे.