पुणे : डेक्कन जिमखाना भागातील पुलाची वाडी येथे मध्यरात्री विजेचा धक्क्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे ही वाचा… पर्यटन नगरी लोणावळ्यात २४ तासात ३७० मिलिमीटर पाऊस; शाळांना दोन दिवसांची सुट्टी

हे ही वाचा… पुण्यात कोसळधारा: ३८ ठिकाणी झाडे कोसळली

शहरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुलाचीवाडी भागातील अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करणारे तीन कामगार गाडी बंद करून आवराआवरी करत होते. त्यानंतर ते घरी निघाले होते. पुलाचीवाडी भागात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तिघांना विजेचा धक्का बसला. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.