आपल्या पिढीत तुटवडा ते उपलब्धता हा बदल झाला आहे. हे बदल दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत आहेत. अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. हा रीसेट झपाट्याने झाला आहे. करोना काळाने विचार करायला भाग पाडले. आपली मुळे घट्ट राखून ठेवतानाच बदलांसाठीही तयार राहिले पाहिजे. आपण नैसर्गिक स्त्रोतांची पिळवणूक केल्यास ते संपुष्टात येतील. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडले. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या १९व्या पदवी प्रदान कार्यक्रमात सीतारामन बोलत होत्या
हेही वाचा- धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय…केली पैशांची मागणी; धनंजय मुंडे यांनी केला खुलासा म्हणाले..
या पदवी प्रदान कार्यक्रमाला सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, आरोग्य शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, पंकज खिमजी यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा- पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात
सीतारामन म्हणाल्या की. आपल्यात ऊर्जा असताना जग बदलावेसे वाटते. पण कालांतराने दृष्टिकोनात बदल होत जाऊन स्वतःमध्येही बदल होतो. ७०च्या दशकात गॅस कनेक्शन मिळत नव्हते. ८०च्या दशकात टेलिफोन श्रीमंतीचे लक्षण मानला जायचा. ९०च्या दशकात वायरलेस फोन आणि पेजर आले. त्यानंतर मोबाईल आले. २०१०नंतर मोबाइलचे जग आले. सर्व सुविधा याच साधनात उपलब्ध झाल्या. ते बदल अल्पावधीत झाले. आर्थिक व्यवहारांमध्येही झपाट्याने बदल झाला. आता सुरक्षित भविष्यासाठी आपण बदल स्वीकारले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला काही बदल करावे लागतील.
हेही वाचा- पुणे: जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे जलधर आराखडे; भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर
डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी सिम्बायोसिसच्या स्थापनेचा प्रवास मांडला. शिक्षण, नोकऱ्या, संशोधक देणे पुरेसे नाही. शिक्षणातून मूल्यशिक्षण आवश्यक आहे. मूल्यशिक्षणाशिवाय शिक्षण दिल्याने सुशिक्षित राक्षस निर्माण होतात. अस्वस्थता निर्माण होण्यास ते कारणीभूत असतात. जी २० परिषदेच्या निमित्ताने आम्ही ‘वसुधैव कुटुम्बकम’ या संकल्पनेचा अभ्यास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स करू इच्छितो. त्यासाठी काही निधीची मागणी त्यांनी केली.