तीव्र इच्छाशक्ती असेल, तर बदल होऊ शकतो, हे नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये दाखवून दिले आहे. गुजरातचे एक मॉडेल त्यांनी देशासमोर ठेवले असून, आता देशाच्या सर्वागीण विकासासाठी त्यांची गरज आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन २७२ प्लस’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
‘देशाला नरेंद्र मोदींची गरज का?’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात आमदार गिरीश बापट, माजी खासदार प्रदीप रावत, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, कूल कुमार अर्बल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष ललित कुमार जैन, तसेच अभय जेरे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या संयोजिका उषा वाजपेयी त्या वेळी उपस्थित होत्या.
बापट म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर देशाचा इतिहास बदलणार आहे. मोंदीनी गुजरातमध्ये जे काम केले, ते आजवर कुणीच करू शकले नाही. त्यामुळे तेच देशाचा विकास साधू शकतात. कुठल्या राजकीय कुटुंबातून नव्हे, तर तळागाळातून आलेली ती व्यक्ती आहे. मोदी पंतप्रधान व्हावेत, असे या देशातील सामान्य माणसाचे म्हणणे आहे. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, असे लोक मोदींच्या मागे आहेत.
रावत म्हणाले की, गुजरातच्या विकासातून त्यांनी देशासमोर एक विकासाचे मॉडेल ठेवले आहे. बदल होऊ शकतो हे त्यांनी देशाला दाखवून दिले. गुजरातच्या यशाची कहाणी एका तीव्र इच्छाशक्तीतून निर्माण झाली. त्याच पद्धतीने मोदी देशाचाही विकास करू शकतात.
महाजन म्हणाले की, देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. चीनने देशाला चारही बाजूने विविध पद्धतीने घेरले आहे. अंतर्गत सुरक्षिततेचा व नक्षलवादाचा प्रश्नही मोठा आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी काय करावे लागेल, हे माहीत आहे. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व सक्षम नेतृत्व नाही. मोदी हे सक्षम नेतृत्व देऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा