पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मागील तीन दिवसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सिनेमा गृहात एका व्यक्तीला मारहाण आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाच्या बाजूने जाणार्या महिलेला जितेंद्र आव्हाड यांनी बाजूला केल्याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग केल्याची तक्रार केली. त्या तक्रारी नुसार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला. मागील तीन दिवसांतील राजकारण लक्षात घेता राजीनामा देत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री ट्विटरवर जाहीर केले. त्यानंतर आज दिवसभरात राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केतकी चितळेवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावर केतकी चितळेने अतिशय हिन भूमिका मांडली असून महाराष्ट्रमध्ये मिनी कंगना राणावत जन्माला येत आहेत अशा शब्दांत केतकी चितळेवर त्यांनी निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आक्रमक झाले असून त्यावर विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, काल ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्याच्या गाडीच्या बाजूने जात होते. त्यावेळी जे समोर येईल त्याला ते बाजूला करण्याचा प्रयत्न ते करत होते. ही बाब समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर संबधित महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंग केल्याची तक्रार देताच गुन्हा दाखलकरण्यात आला. .त्या घटनेमुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भावना सोशल माध्यमावर मांडत राजीनामा देण्याच जाहीर केले आहे. मात्र त्यांनी संतापून किंवा दुःखी होऊन राजीनामा देऊ नये असे आव्हान त्यांना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या पुढे म्हणल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. सध्याचे राजकारण एकमेकांच्या विरोधात हीन पातळीवरचे सुरु असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा: Gujarat Election 2022: पृथ्वीराज चव्हाणांवर बडोदा व अहमदाबादच्या निरीक्षकपदाची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यावधी निवडणुकी बाबत भाष्य केले आहे.त्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणल्या की,उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका लागतील असं बोलेल तर त्यांच्यावरच काही लोकांनी टीका केली.परंतु लोकशाहीबाबत दंडेलशाही चालु आहे. मात्र निवडणुकीचे निर्णय गुजरातनंतर होऊ शकतो. याची चाहुल ही केंद्र सरकारच्या निर्णयांच्या घाईवरून जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: ऊसदराबाबत शेतकरी संघटनांची पायी दिंडी; यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला घातले साकडे
एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांना सतत विरोधकांकडून ५० खोके यावरून टीका केली जात आहे. त्यावर शिंदे गटाकडून विरोधकांना कायदेशीर नोटीस पाठवली जाणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगितले जात आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, ५० खोक्यांवरून बोलले तर एवढं का वाईट वाटतं. मला एका शिवसेना कार्यकर्त्याचा फोन आला होता.तो कार्यकर्ता त्यांना रुमाल भेट देणार आहेत. राजकारणात अशा मतभेदामुळे रागावून न जाता उत्तरे द्यायला हवीत अशा शब्दात शिंदे गटातील आमदारांना त्यांनी सुनावले.