वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश प्राधिकरणातर्फे (एनटीए) १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) प्रवेशपत्र मंगळवारपासून (१२ जुलै) उपलब्ध करण्यात आले. एनटीएच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. देशभरातील ४९७ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

हेही वाचा- हृदयद्रावक: खड्ड्यात अंघोळीसाठी उतरलेल्या तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू; चाकण येथील घटना

प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्याला केंद्रावर प्रवेश नाही

एनटीएने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. neet.nta.nic.in या संकेत स्थळावरुन विद्यार्थी प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांकाचा वापर करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्याला केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. ‘नीट’ परीक्षा होणाऱ्या परीक्षा केंद्रांची यादी या पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी एनटीए कडे परीक्षा केंद्र आणि शहर बदलण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार त्यांचे केंद्र बदलण्यात आले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्रात बदल केला जाणार नाही.

हेही वाचा- करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीचे निर्देश ; महाविद्यालयांना अहवाल सादर करण्यासाठी ३१ जुलैची मुदत

प्रवेशपत्रासंदर्भात अडचणींसाठी टोल फ्री क्रमांक जारी

पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे नियोजन करण्याची सूचना एनटीएने केली. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासंदर्भात अडचणींसाठी ०११-४०७५९००० या क्रमांकावर किंवा neet@nta.ac.in. या ईमेलद्वारे संपर्क साधता येईल.

Story img Loader