पुणे : राज्यात शिक्षक भरतीसह प्राध्यापक भरती प्रक्रियाही प्रलंबित आहे. नुकतेच शिक्षक भरतीसाठी उपोषण सुरू झालेले असताना प्राध्यापक भरती करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीने गुरुवारपासून पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची १० हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने रिक्त जागांच्या ४० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र प्राध्यापक भरती प्रक्रिया अनेक तांत्रिक कारणांनी रखडली असल्याने राज्यभरातील हजारो पात्रताधारक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. आतापर्यंत प्राध्यापक भरतीसाठी वारंवार मागण्या करून, आंदोलने करण्यात आली आहेत.

हेही वाचा – सावधान! पिकांवर कीडनाशकांचा वापर वाढतोय; जाणून घ्या कारणे

हेही वाचा – डॉक्टरांची कमाल! रुग्णाला शुद्धीवर ठेवून गुंतागुंतीची मेंदू शस्त्रक्रिया

या पार्श्वभूमीवर नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीकडून पुन्हा सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले. केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार १०० टक्के प्राध्यापक भरती करावी, तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन धोरण लागू करावे, सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करावी, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती करावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Net set phd holder sangharsh samiti has started satyagraha agitation in pune from thursday to demand recruitment of professors pune print news ccp 14 ssb
Show comments