राज्याच्या सहकार कायदा दुरुस्ती समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र अर्बन को. ऑप. बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी लिहिलेल्या नवीन सुधारित सहकार कायद्यावरील पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सहकार खात्याचे अप्पर निबंधक भानुदास बधान, दिनेश ओऊळकर, सहनिबंधक धनंजय डोईफोडे, पुणे जिल्हा बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विजय ढेरे, मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते या वेळी उपस्थित होते. ९७ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्याच्या सहकार कायद्यात योग्य त्या सुधारणा करण्याचा अध्यादेश राज्यपालांनी १४ फेब्रुवारीला जाहीर केला होता. त्यानुसार हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. या पुस्तकात कायद्यातील नवीन तरतुदींसह वगळलेल्या जुन्या तरतुदींचाही समावेश आहे. हे पुस्तक खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी ०२०-२४२१२७४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पुस्तकांच्या प्रकाशकांनी कळविले आहे.
नवीन सहकार कायद्यावरील पुस्तक प्रकाशित
राज्याच्या सहकार कायदा दुरुस्ती समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र अर्बन को. ऑप. बँक्स् फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी लिहिलेल्या नवीन सुधारित सहकार कायद्यावरील पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
First published on: 16-03-2013 at 01:15 IST
TOPICSप्रकाशित
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New book on co operative law published