पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल सुरेंद्र कुमार अगरवाल याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. २००७ साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७१ सोसायटी धारकांना पार्किंग, मोकळी जागा देणे बंधनकारक असताना तीन सोसायटी तयार करून एकाच ठिकाणी अँमीनीटी स्पेस आणि मोकळी जागा दर्शवून सोसायटी धारकांची परवानगी नसताना बिल्डर ने ११ मजली आणि १० मजली इमारत बांधून फसवणूक केल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसात विशाल अरुण अडसूळ यांनी तक्रार दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी विशाल सुरेंद्र कुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल(बंधू), विनोद कुमार अगरवाल, नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्या विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…राज्यात डेंग्यूचा धोका वाढला, गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्या दीडपट; पालघर, कोल्हापूरमध्ये जास्त प्रमाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ साली बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ.सोसायटी ७१ जणांनी फ्लॅट घेतला होता. याच सोसायटीच्या मालकीची तिथे पार्किंग आणि अँमीनीटी स्पेस, मोकळी जागा आहे. परंतु, एकाच ठिकाणची जागा वेगवेगळ्या नकाशावर दर्शवून नकाशात फेरबदल करून तसे नकाशे मंजूर करून नॅन्सी ब्रम्हा सोसायटी सभासदांची कोणतीही परवानगी नसताना बिल्डर विशाल अगरवाल यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून सोसायटीच्या जागेवर ११ मजली इमारतीत ६६ कमर्शियल ऑफिस बांधले तर १० मजली इमारतीत २७ सदनिका आणि १८ शॉप्स बांधून नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ. सो.ली सोसायटी धारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New case filed against porsche car accident accused vishal surendra kumar agarwal in pune for cheating society members in construction scam kjp 91 psg