महापालिका शहर सुधारणा समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती आणि क्रीडा समितीवरील प्रत्येकी तेरा सदस्यांची निवड प्रक्रिया सोमवारी सर्वसाधारण सभेत पार पडली. संख्याबळानुसार या समित्यांमध्ये राष्ट्रवादीच्या पाच, मनसेच्या तीन, काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी दोन तर शिवसेनेच्या एका सदस्याला संधी मिळाली आहे. या निवडीमध्ये सर्वच पक्षांनी प्रथमच निवडून आलेल्यांना संधी दिली असून समित्यांवरील ५२ पैकी ३८ सदस्य नवे आहेत.
चार समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम सर्वसाधारण सभेत पार पडल्यानंतर आता या समित्यांची अध्यक्षपदे कोणाला मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (५ मार्च) होत असून त्यानंतर या समितीत्यांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया होईल.
शहर सुधारणा समितीवर नियुक्त झालेले सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. प्रदीप गायकवाड, मोहिनी देवकर, सुषमा निम्हण, महेंद्र पठारे, शिवलाल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस), लता राजगुरू, कैलास गायकवाड (काँग्रेस), प्रकाश ढोरे, अजय तायडे, राजेश बराटे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), योगेश टिळेकर, वर्षां तापकीर (भारतीय जनता पक्ष), कल्पना थोरवे (शिवसेना).
विधी समिती:- संगीता कुदळे, बंडू केमसे, सुमन पठारे, दिलीप बराटे, किशोर विटकर (राष्ट्रवादी काँग्रेस), सुधीर जानजोत, शशिकला गायकवाड (काँग्रेस), जयश्री मारणे, सुशीला नेटके, राहुल तुपेरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कविता वैरागे, बापू कांबळे (भारतीय जनता पक्ष), विजय देशमुख (शिवसेना).
महिला व बालकल्याण समिती:- आनंद अलकुंटे, राजश्री आंदेकर, शारदा ओरसे, मीना परदेशी, सुनंदा देवकर (राष्ट्रवादी काँग्रेस), विजया वाडकर, वैशाली मराठे (काँग्रेस), अस्मिता शिंदे, कल्पना बहिरट, संगीता तिकोने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), प्रतिभा ढमाले, मनीषा चोरबेले (भारतीय जनता पक्ष), संगीता ठोसर (शिवसेना).
क्रीडा समिती:– अनिल टिंगरे, लक्ष्मी दुधाने, दिनेश धाडवे, चंचला कोद्रे, उदयकांत आंदेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), मुकारी अलगुडे, बंडू गायकवाड (काँग्रेस), रूपाली पाटील, सुनीता साळुंके, अर्चना कांबळे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), श्रीकांत जगताप, दिलीप काळोखे (भारतीय जनता पक्ष), सोनम झेंडे (शिवसेना).