पुणेमार्गे मुंबई-सोलापूर या मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने नवी एक्स्प्रेस रेल्वे सुरू केली आहे. ही गाडी आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे. सोलापूर-मुंबई ही गाडी बुधवार वगळता इतर सहा दिवस धावेल, तर मुंबई-सोलापूर ही गाडी गुरुवार वगळता इतर दिवशी सोडण्यात येणार आहे.
मुंबई-सोलापूर ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सोडण्यात येईल. मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी ती लोणावळ्यात दाखल होईल. दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता ही गाडी पुण्यात येईल व त्यानंतर सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी सोलापूरला पोहोचेल. सोलापूर-मुंबई ही गाडी सोलापूरहून रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सोडण्यात येईल. पुण्यात ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता येईल. ही गाडी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल.

Story img Loader