पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील देशी, विदेशी दारू, बिअर, वाइन विक्रीचे नवे परवाने, परवाना दुरुस्ती, हस्तांतरण आणि नूतनीकरण प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तास अगोदरपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस (ड्राय डे) म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी मद्य विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश काढले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील बारामती मतदारसंघासाठी ५ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया संपेपपर्यंत, तर पुणे, मावळ आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी ११ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून १३ मे मतदानाच्या दिवशी मतदान संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी संपूर्ण दिवस सर्व मद्यालये, मद्य विक्री दुकाने आणि इतर मद्यविषयक आस्थापना बंद राहणार आहेत.

हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

ड्राय डे पाळण्याच्या अनुषंगाने बारामती आणि इतर तीन मतदारसंघाच्या मतदानाच्या ४८ तास अगोदर देशी, विदेशी दारूचे बार, दुकाने आणि ताडी केंद्र बंद ठेवण्यात येणार असून यांच्या वाहतुकीवरही निर्बंध असणार आहेत. केवळ परवानाधारकांना दारू निर्मिती करता येऊ शकणार आहे. मात्र, विक्री, वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न केल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ आणि त्याअंतर्गत तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आदेशात देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New liquor licenses renewal closed in pune till june 4 pune print news psg 17 ssb