लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल येत्या शनिवारपासून (१२ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे. या नव्या उड्डाणपुलाला सुशोभीकरणाचा साजही देण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिमद्वाराकडील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असून दहा महिन्यांच्या विक्रमी काळात उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
dharmarajya party agitation against evm in thane
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
Traffic jam due to closure of road leading from Shaniwar Chowk towards Mandai Pune news
शनिवारची सुट्टी वाहतूक कोंडीत… कोठे घडला प्रकार?
Lakshmi Road closed to traffic on the occasion of Pedestrian Day Pune news
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद
pipeline laying work, Pune-Solapur route, traffic on Pune-Solapur route,
जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल
flyover constructed on Mumbra Panvel Highway at Kalamboli Circle become waiting bridge for heavy vehicles
कळंबोली सर्कलला कोंडीचा फेरा,मुंब्रा,पनवेल उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल
Traffic changes due to flyover work at Katraj Chowk Confusion among people due to having to take alternative route
कात्रज चौकाची ‘कोंडी’… वाहतुकीचा बोजवारा

केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. चांदणी चौक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. मात्र अरूंद रस्त्यामुळे चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर जुना पूल पाडून नव्याने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय जाहीर झाला. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि जुन्या उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आला.

आणखी वाचा-‘मेरी मिट्टी, मेरा देश’ची शपथ घेण्यासाठी जाताना अपघातात पोलीस हवालदाराचा मृत्यू

चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. दोन ऑक्टोबर रोजी जुना पूल पाडण्यात आल्यानंतर नव्या उड्डाणपुलासाठी काम सुरू करण्यात आले. त्यानंतर अडचणींवर मात करत उड्डाणपूलचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या. हा नवा उड्डाणपूल ११५ मीटर लांब असून ३६ मीटर रुंदीचा आहे.

आणखी वाचा-कैदीच देणार आता कैद्यांना कायद्याचे ज्ञान!

एनडीए, मुळशीकडून येऊन बावधन, पाषाण, वारजे आणि कोथरूडकडे जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असून एनडीए, मुळशीकडून येऊन मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. मुंबईकडून येऊन बावधन किंवा पाषाणला जाण्यासाठी महामार्गावरील पाषाण जोड रस्त्याने (विवा ईन हॉटेल) जाता येणार आहे. मुंबईकडून येऊन मुळशीकडे जाण्यासाठी कोथरूड भुयारी मार्गाने एनडीए चौक मार्गे वेदविहार, मुळशी, एनडीएला जाता येणार आहे. बावधन, पाषाणकडून वारजे, कात्रजकडे जाण्यासाठी पाषाण कनेक्टर रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. कोथरूड ते सातारा, वारजे ही वाहतूक सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावरील शृंगेरी मठाजवळून महामार्गाने जाणार आहे. वारजे, साताऱ्याकडून येऊन पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना नवीन उड्डापुलाच्या स्वतंत्र मार्गिकेवरून मुळशी रस्त्याला येता येणार आहे. यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

Story img Loader