पिंपरी : आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वीची माहिती घेण्यासाठी पिंपरी महापालिकेने मोठा गाजावाजा करून उभारलेल्या तारांगण प्रकल्पाला अवघ्या पाच महिन्यांत गळती लागली आहे. त्यामुळे तारांगणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत असून, तारांगणाच्या घुमटाच्या दुरुस्तीसाठी आता पुन्हा वीस लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

अंतराळ क्षेत्राची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांना या विषयात रस निर्माण होण्यासाठी पिंपरी महापालिकेने चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ तारांगण प्रकल्प उभारला आहे. ११ कोटी १२ लाख ४३ हजार रुपयांचा खर्च त्यासाठी करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मे महिन्यात या तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तारांगण पाहण्यासाठी शहरातील विद्यार्थी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही दिवसांतच पावसाचे पाणी तारांगण प्रकल्पातील १५ मीटर व्यासाच्या घुमटातून गळू लागले. त्यामुळे तारांगण प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली. आता या घुमटाची दुरुस्ती करावी लागणार आहे. मात्र घुमटाची दुरुस्ती कणाऱ्या संस्थांची संख्या कमी असल्याने महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हेही वाचा – पिंपरी, आकुर्डीतील ९३८ सदनिकांच्या सोडतीचा मार्ग मोकळा, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

काचेच्या सांध्यातून (जॉइंट) पावसाच्या पाण्याची गळती होऊ नये म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे. या सांध्याला आता धातूची पट्टी बसविण्यात येणार आहे. घुमटाच्या दुरुस्तीसाठी २० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील नदीकाठचा १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठीच्या एक कोटी ५० लाखांच्या निधीतून २० लाख रुपयांचा निधी तारांगण दुरुस्तीसाठी वळवण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

हेही वाचा – अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलकडून पाच किलो सोने जप्त

घुमटाची दुरस्ती करण्याबाबत सल्लागाराने सुचविले आहे. त्यानुसार निविदा काढून दुरस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. – राजेंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका