जळगावहून ३९ यंत्रे पुण्यात येणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहर आणि जिल्ह्य़ातील नादुरूस्त आधार यंत्रे दुरूस्त करण्याच्या अवस्थेत नाहीत. त्यामुळे शंभर नवी यंत्रे उपलब्ध करून द्यावीत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया – यूआयडीएआय) पुन्हा पाठविण्यात आला आहे. तसेच शहरातील आधार केंद्रांची वाढती गरज पाहता जळगाव जिल्ह्य़ातील ३९ आधार यंत्रे पुण्यात येत्या आठवडय़ात दाखल होणार आहेत.

आधार यंत्र दुरूस्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून नादुरूस्त यंत्रांची यादी करण्यात आली होती. काही यंत्रांमधील किरकोळ दुरूस्त्या करून ती यंत्रे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, शंभरपेक्षा अधिक नादुरूस्त आधार यंत्रे दुरूस्त करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे ही यंत्रे दुरूस्त करणे अशक्य असल्याने जिल्हा प्रशासनाकडून राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव कार्यालय आणि विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे, नवी शंभर आधार यंत्रे पुरविण्याबाबतचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात पाठविण्यात आला होता. मात्र, नव्या शंभर यंत्रांबाबतचा प्रस्ताव पुन्हा नव्याने पाठविण्याचे आदेश युआयडीएआय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार चालू आठवडय़ात प्रशासनाकडून हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा प्रशासनाची बैठक मागील आठवडय़ात पार पडली. त्यामध्ये शहर आणि जिल्ह्य़ातील आधार यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या यंत्रचालकांकडून आधार यंत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही यंत्रे नव्या यंत्रचालकांकडे चालविण्यास देण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालयांत सध्या पाच आधार केंद्रे सुरू आहेत.

ही संख्या आठवर नेण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील आधारकोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच पुणे महापालिका कार्यक्षेत्रात, विशेषकरून क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अतिरिक्त आधार यंत्रे पुरविण्याचे सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती आधार समन्वयक अधिकारी विकास भालेराव यांनी दिली.

दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्य़ातील आधार केंद्रांची वाढती गरज पाहता जळगाव जिल्ह्य़ातील ३९ आधार केंद्रे पुण्यात दाखल होणार आहेत. ही यंत्रे महाऑनलाइन या सरकारी कंपनीच्या माध्यमातून लवकरच शहरात दाखल होतील, असेही भालेराव यांनी सांगितले.