पुणे : पुण्यातील जैवविविधतेचा प्रत्यय देणारे संशोधन एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. बाणेर टेकडी येथे उडी मारणाऱ्या कोळ्याची नवीन प्रजाती शोधण्यात आली असून, ‘ओकिनाविसियस टेकडी’ असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी, केरळमधील ख्राईस्ट कॉलेजच्या ऋषिकेश त्रिपाठी यांनी हे संशोधन केले. त्यांना एमआयटीतील डॉ. पंकज कोपर्डे, ख्राइस्ट कॉलेजचे डॉ. ए. व्ही. सुधिकुमार यांनी मार्गदर्शन केले. युनायटेड किंग्डममधील अराक्नोलॉजी या संशोधनपत्रिकेत या बाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचा – अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा; ‘हे’ आहे कारण

बाणेर टेकडीवरील चारा, वड-पिंपळ अशा झाडांवर या कोळ्याचा अभ्यास केल्यानंतर ही नवी प्रजाती असल्याचे निदर्शनास आले. ही प्रजाती टेकडीवर आढळल्याने त्याचे नामकरण करताना त्यात टेकडीचा समावेश करण्यात आला. ‘ओकिनाविसियस टेकडी’ आणि इतर स्थानिक प्रजातींची त्यांच्या परिसंस्थेत काय भूमिका आहे या दृष्टीने अधिक अभ्यास करण्यात येत आहे.

कोळ्याच्या ‘ओकिनाविसियस टेकडी’ या प्रजातीच्या शोधाचा अतिशय आनंद आहे. ही प्रजाती ‘ओटाकरेंसिस’ या प्रजातीच्या जवळची आहे. मात्र यात आकाराचा फरक आहे. हे कोळी जाड फांद्या आणि घनदाट झाडांवर विशेषतः चाफा, फायकस म्हणजे वड, पिंपळ अशा झाडांवर आढळले. राम-मुळा संगम क्षेत्रात ही प्रजाती आढळली आहे. तेथे त्याच्यासाठी योग्य पर्यावरणीय व्यवस्था आहे, असे अथर्व कुलकर्णीने सांगितले. तर पुण्याच्या समृद्ध नैसर्गिक वारशात एक छोटी, पण महत्त्वाची भर या शोधामुळे पडली आहे, असे त्रिपाठी यांनी नमूद केले.

हेही वाचा – भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

ओकिनाविसियस टेकडी ही प्रजाती बाणेर टेकडी आणि पुण्यातील इतर तत्सम जागांसाठी एक प्रतीक होऊ शकते. या शोधामुळे शहरी टेकड्यांकडे आणि जंगलांकडे जबाबदारीच्या भावनेने पाहणे गरजेचे आहे. हा शोध शहरी जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठीची धोरणात्मक गरज अधोरेखित करतो. त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर संरक्षणासाठी त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता असल्याकडे डॉ. कोपर्डे यांनी लक्ष वेधले.