पुणे : बालकांना सर्वसमावेशक, सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने पाळणाघरांसाठीची मानके जाहीर केली आहेत. त्यात पाळणाघर व्यवस्थापनापासून सोईसुविधा, सुरक्षितता अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने पाळणाघरांसाठीची मानके तयार केली. त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात एकूण २१ महत्त्वाच्या घटकांवर भर देण्यात आला आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे सेवा क्षेत्र यांचा विचार करून पाळणाघर सुरू करणे आणि त्याचे व्यवस्थापन याबाबतचे निकष निश्चित केले आहेत.
हेही वाचा >>>गुढीपाडव्याला हलक्या सरी?
महत्त्वाच्या घटकांवर भर
’पाळणाघरात सीसीटीव्ही आवश्यक. पाळणाघर कार्यालयीन जागेत, निवासी सदनिका, सोसायटी, शाळा, रुग्णालय, सहकारी कार्यालय किंवा आवश्यकतेनुसार अन्य जागेत सुरू करता येणार आहे.
’पाळणाघर शक्यतो तळमजल्यावर असावे, पाळणाघराची वेळ चालक आणि पालक यांच्या परस्पर सोईनुसार असावी.
’पाळणाघर स्वच्छतेवर विशेष भर देण्यात यावा.
’दृक-श्राव्य साहित्याबरोबर मुलांच्या वयानुरूप, मुलांचे आकलन वाढवणारी खेळणी असावीत.
’पाळणाघरात प्रथमोपचाराचे साहित्य, पाळणाघरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंदवही असली पाहिजे.
’पाळणाघर प्रशासन समितीमध्ये किमान तीन मुलांच्या पालकांचा समावेश असणे आवश्यक आहे.
’कर्मचाऱ्यांमध्ये पर्यवेक्षक किमान बारावी उत्तीर्ण, तर मदतनीस किमान दहावी उत्तीर्ण असावा.