आकाश टॅबलेटनंतर आता बीएसएनएलने विश-टेल या कंपनीच्या साहाय्याने नवा टॅबलेट बाजारात आणला आहे. टू-जी व थ्री-जी सेवा असलेल्या या टॅबलेटमध्ये त्याचप्रमाणे मोबाइल व संगणकाचीही नव्या टॅबलेटमध्ये सुविधा देण्यात आली आहे.
बीएसएनएलच्या महाराष्ट्र विभागाचे सरव्यवस्थापक ए. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते या नव्या टॅबलेटचे उद्घाटन करण्यात आले. पुणे विभागाचे मुख्य प्रबंधक एम. के. जैन, विश-टेल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शहा, प्रभात सिंह, विहंग नाईक आदी या वेळी उपस्थित होते.
नवा टॅबलेट बीएसएनएलच्या सर्व फ्रान्चायजींकडे उपलब्ध होणार आहेत. हा टॅबलेट घेणाऱ्यांना बीएसएनएलकडून टू-जी व थ्री-जी सीमकार्ड पहिल्या सहा महिन्यांसाठी मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे तीनशे मिनिटांचा टॉकटाइमही मोफत दिला जाईल. विशेषत: शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांना या टॅबलेटचा उपयोग होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले. ६,६९९ या किमतीला उपलब्ध होणाऱ्या या टॅबलेटमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये ई-मेल पाठविण्याची सुविधेबरोबरच व्हिडिओ फोनचीही सुविधा देण्यात आली आहे.                                                                                                                                                                               (संग्रहित छायाचित्र)

Story img Loader