पुणे : पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले. हे काम पूर्ण होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टर्मिनलचे उद्घाटन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र, त्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाला मुहूर्त लागत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> कामगारांना खुशखबर! ‘या’ राज्यात होणार ईएसआयसी’ रुग्णालये

Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?

पुणे विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. हे टर्मिनल पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्यात प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल असून, याचबरोबर ३४ चेक-इन काऊंटर असतील. तसेच, बॅगांसाठी इन-लाईन बॅगेल हँडलिंग सिस्टिम असेल. या टर्मिनलमध्ये २७ हजार चौरस फुटांमध्ये पादचारी उड्डाणपूल आणि विक्री केंद्रांसोबत प्रवाशांसाठी सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. नवीन टर्मिनलसाठी एकूण किंमत ४७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जोतिरादित्य शिंदे लवकरच टर्मिनलची पाहणी करणार आहेत. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे नूतनीकरणही केले जाणार आहे. नवीन टर्मिनलचे उद्घाटनावेळी आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक सेवेचाही प्रारंभ केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> ओैषधाच्या नावाखाली नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांसाठी गोव्यातील मद्याची तस्करी; पुण्यात ८२ लाखांचा मद्यसाठा जप्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन टर्मिनलचे काम पूर्ण झालेले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवीन टर्मिनलची सहा आठवडे चाचणी घेतली जाणार आहे. नवीन टर्मिनल योग्य पद्धतीने कार्य करीत असल्याची खातरजमा केली जाणार आहे. मात्र, नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची मंजुरी मिळालेली नाही. टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर चाचण्या सुरू होतील. या चाचण्यांनंतर प्रत्यक्ष टर्मिनलचा वापर करण्यास परवानगी मिळेल. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर जुन्या इमारतीचे नूतनीकरण सुरू केले जाणार आहे. विमानतळाची जुनी इमारत आणि नवीन टर्मिनल एकमेकांशी जोडली जाणार आहे. पादचारी पुलांद्वारे या दोन्ही इमारती जोडल्या जातील. पुण्याची सांस्कृतिक ओळख दाखवणारी ही नवीन इमारत आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर विमानतळाची प्रवासी क्षमता जवळपास दुपटीने वाढणार आहे.

पुण्यातील हवाई प्रवासी

– जुन्या इमारतीची वार्षिक क्षमता : ७१ लाख

– नवीन टर्मिनलची वार्षिक क्षमता : १ कोटी २० लाख

– एकत्रित वार्षिक क्षमता : १ कोटी ९१ लाख

असे असेल नवीन टर्मिनल

– एकूण क्षेत्रफळ : ५ लाख चौरस फूट

– तासाला प्रवासी क्षमता : १ हजार ४००

– बोर्डिंग पूल : ५

– प्रवासी लिफ्ट : १५

– सरकते जिने : ८

– चेक-इन काऊंटर : ३४

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. नवीन टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतर त्याच्या चाचण्या सुरू होतील. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्षात नवीन टर्मिनलचा वापर सुरू होईल.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ