पुणे : संततधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान ही चाचणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने तरुणावर कोयत्याने वार; कोंढव्यातील घटना

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मैदानी चाचणी ९ ते २७ जुलै या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, संततधार पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानूसार उमेदवरांनी आपल्याला महाआयटी विभाग, मुंबई यांचेकडून देण्यात आलेले पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर रहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.

ग्रामीण पोलीस मैदानी चाचणी नवीन वेळापत्रक

पुर्वीची तारीखनवीन तारीख
९ आणि १० जुलै२९ जुलै
११ जुलै३० जुलै
१२ जुलै३१ जुलै
१३ जुलै१ ऑगस्ट
१५ जुलै२ ऑगस्ट
२५ जुलै५ ऑगस्ट
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New time table announced for pune rural police recruitment for 448 posts pune print news rbk 25 css