पुणे : सांडपाणी प्रक्रियेतून रेल्वेने मोठी पाणी बचत सुरू केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून लाखो लिटर पाणी रेल्वेला मिळत आहे. या प्रकल्पातून मिळालेले पाणी लोहमार्ग धुण्यासाठी व स्थानकांवर इतर स्वच्छतेच्या कामांसाठी वापरले जात आहे. त्यामुळे मध्य रेल्नेचा पिण्याच्या पाण्याचा एकूण वापर ६.३ टक्क्याने कमी झाला आहे.
मध्य रेल्वेच्या पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमावर भऱ दिला आहे. शुद्ध पाण्याच्या वापर कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर केला जात आहे. यासाठी मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि गृह व्यवस्थापन विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जलसंधारणाबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि रेल्वे मंडळाने दिलेल्या निर्देशानुसार हे उपाय केले जात आहेत.
हेही वाचा >>> इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी
मध्य रेल्वेकडे सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. त्यातून दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. वाढत्या जलसंकटावर शाश्वत उपाय म्हणून ही उपाययोजा सुरू आहे. य़ाचबरोबर प्रदूषित पाणी पर्यावरणात सोडले जाऊ नये, हासुद्धा यामागील उद्देश आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर स्वच्छतेसाठी वापरले जात आहे. यात लोहमार्ग धुणे, रेल्वे स्थानकांचे मजले पुसणे आदी कामांचा समावेश आहे. पिण्यायोग्य कारणांसाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी त्याचा वापर होत नाही.
मागील वर्षी दहा प्रकल्प कार्यान्वित
मध्य रेल्वेने २०२२ मध्ये १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केले. त्यांची क्षमता १ हजार ५७५ किलोलिटर प्रतिदिन (केएलडी) आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे दोन प्रकल्प, अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, नाशिक रोड येथे २०० केएलडी क्षमतेचा प्रकल्प, अकोला येथे ५०० केएलडी क्षमतेचा प्रकल्प, खांडवा येथे ५०० केएलडी क्षमतेचा प्रकल्प, कोपरगाव येथे १५ केएलडी क्षमतेचा प्रकल्प, सोलापूरमध्ये १५ केएलडी क्षमतेचा प्रकल्प, अजनी (नागपूर) येथे ४० केएलडी आणि साईनगर शिर्डी येथए १५ केएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा समावेश आहे.