पुणे : ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटच्या विरोधात कोव्होव्हॅक्स लशीला बूस्टर म्हणून येत्या काही दिवसांत मान्यता मिळेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी रविवारी दिली. कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन बंद आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्काराने  अदर पूनावाला यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधला.’केंद्र सरकारकडे कोव्हीशिल्ड लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तूर्तास लसीचे उत्पादन बंद असले तरी आवश्यकता भासल्यास पुन्हा सुरू केले जाईल, असे त्यांनी कोव्हिशिल्ड लशीच्या अपु-या पुरवठ्याबाबत सांगितले. ते म्हणाले की, नवीन व्हेरियंटविरोधात कोव्होव्हॅकस जास्त परिणामकारक आहे. त्यामुळे बूस्टर मात्रेसाठी लवकरच परवानगी मिळेल.