श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मतिमंदांच्या पुनर्वसन चळवळीत सहभागी होणारा पालकांचा एक गट. या गटाने ठरवले, की आपल्या मुलांचे पुनर्वसन करण्याबरोबरच इतर मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठीही आपण पुढाकार घ्यायचा. या मुलांना समाजाने स्वीकारावे, तसेच या मुलांच्या समस्यांसह पालकांमध्ये जनजागृती करावी अशा विविध विचारांनी हा गट झटू लागला आणि पाहता-पाहता या गटाचे ‘उमेद’ परिवारात रुपांतर झाले. याच ‘उमेद परिवारा’ने गेल्या काही वर्षांमध्ये जे काम केले आहे, ते वाखाणण्याजोगे आहे.
उमेद परिवार हा एक आगळावेगळा परिवार आहे, जो बौद्धिक कमतरता आणि बहुविकलांग मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन या मुलांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी काम करतो. या परिवाराचा वटवृक्ष झालेला दिसतो आहे, तो त्यांच्या अनेक वर्षांच्या सातत्याने केल्या जाणाऱ्या परिश्रमांनंतर. मुख्यत: पुण्यात अतिशय उत्साहाने आणि हिरिरीने काम करणारा हा परिवार. मानसिक वंचित (मतिमंद) आणि बहुविकलांग व्यक्तींचे पुनर्वसन, त्याबरोबरच त्यांना शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, वास्तव्य आणि त्यांच्या आरोग्याची सोय यासाठी मदत करणे आदी कार्य करतो. यासाठी काम करणारे पालक-शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि मार्गदर्शन कार्यशाळा परिवारामार्फत आयोजित केल्या जातात.
ज्या व्यक्ती शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ‘डे केअर’ केंद्र चालवणे, शेती किंवा अन्य व्यवसायांची निर्मिती आणि विकास करणे, पालकांच्या मृत्यूनंतरही अशा व्यक्तीची काळजी घेणे, माहिती केंद्र चालवणे आदी या परिवाराची उद्दिष्टं. या उद्दिष्टपूर्तींसाठी पुण्यापासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर वडकी नाला येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी, या मुलांच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी सुरेख वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. पालकांच्या मनोबल वाढीसाठी नियमित बैठका, कार्यशाळा, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, इतरत्र पालकांच्या संस्था निर्माण करण्यासाठी मदत करणे आदी कार्यदेखील या परिवाराच्या माध्यमातून केली जातात. या व्यक्तींच्या विकासासाठी आणि प्रतिबंधासाठी संशोधन प्रकल्प चालवण्याचेदेखील या परिवाराचे उद्दिष्ट आहेच. त्यातूनच पुढे जात या मुलांच्या समस्यांसंदर्भात संबंधित साहित्याचे प्रकाशनही केले जाते. या परिवाराचा पाया म्हणजे बौद्धिक कमतरता आणि बहुविकलांग मुलांच्या पालकांना मानसिक आणि भावनिक आधार देणे आणि आपल्या पाल्यांना मदत करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी नियमितपणे त्यांच्या बैठकांचे नियोजन करणे. त्यांना संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करणे, असलेल्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी कार्यरत करणे, त्यांना समर्थ बनवणे. आपापसातील ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे आदी गोष्टीपण केल्या जातात. या समस्येसंबंधित विविध उपयुक्त माहिती, जसे की साहित्य, मदत करणाऱ्या संस्थांची, तज्ज्ञांची नावे, पत्ते गोळा करून ही अद्ययावत माहिती संबंधितांपर्यंत पोहोचविणे. तसेच आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही परिवारामार्फत करण्यात येते. काही विशिष्ट कामासाठी पालकांना बाहेरगावी जायचे असेल आणि तेवढय़ा काळासाठी पाल्याची राहण्यासाठी सोय करणे आवश्यक असेल तर तशी सोय या परिवाराच्या वसतिगृहात केली जाते.
बऱ्याचवेळा या व्यक्तींना काय येत नाही हे सर्वसाधारणपणे माहिती असते, परंतु यात सकारात्मकता आणण्यासाठी यांना काय करता येईल याचा शोध घेणे आवश्यक असते. त्यासाठी उमेद परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. उमेदच्या स्थापना दिनाच्या समारंभानिमित्ताने आयोजित कार्यक्रमातून काम करणाऱ्या सर्व संस्था, संबंधित शाळांना एकत्र करून त्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण केले जाते. याशिवाय राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. मुलांना आणि शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यात सहभागी झालेल्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करुन समाजात या विषयाबद्दल जागृती केली जाते. एकमेकांच्या अनुभवावरून शिकता यावे, परिश्रमांची पुनरावृत्ती टाळता यावी आणि उच्चस्तरीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन सर्वाना लाभावे म्हणून राज्यस्तरीय संमेलनांचे आयोजन करण्यात येते. उमेद परिवाराच्या अनुभवातून, अखंड परिश्रमातून आणि दूरदृष्टीने पुण्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर, अतिशय रम्य वातावरणात परिवाराचे आधुनिक वसतिगृह आहे. तेथे सध्या वीस प्रौढ मतिमंद विद्यार्थी निवासी आहेत. या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दैनंदिन प्रार्थना, व्यायाम, योगासने आणि ध्यान आदी गोष्टींवर भर दिला जातो. तसेच त्याचे दैनंदिन जीवन कृतिशील असावे यासाठी साबण, फिनेल, मेणबत्त्या, कागदाच्या पिशव्या, फाईल्स करण्याचे प्रशिक्षण देऊन मुलांकडून या वस्तू तयार करुन घेण्यात येतात. विविध सणांसाठी लागणारी उत्पादने आणि भेटवस्तूंचे उत्पादनदेखील या परिवाराच्या कार्यशाळेत करण्यात येतात. या संस्थेच्या कार्याची ज्यांना गरज आहे किंवा ही संस्था ज्यांना पाहायची असेल ते ९८२२०३००९३ किंवा ९८५००४५४५६ या क्रमांकावर संपर्क साधून संस्थाचालकांशी संपर्क करु शकतात.