लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आयसिस आणि अलसुफा या दहशतवादी संघटनांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तपास सुरू केला आहे. चार फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एनआयएने प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी कोथरुड भागातून अटक केली होती. राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) एनआयएकडे नुकताच तपास हस्तांतरित करण्यात आला.

CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sahyadri sankalp society work for growth and conservation of ratnagiri forests
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
schools, America, mobile phones,
विश्लेषण : विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेत शाळा आग्रही का? काही राज्ये कायदा करणार?
pradhan mantri jan dhan yojana latest marathi news
आर्थिक उन्नतीचे ‘जनधन’
Sukoon Scheme in Family Courts to settle pending cases of family disputes Pune news
कौटुंबिक न्यायालायात ‘सुकून’ योजना; कौटुंबिक वादाची प्रलंबित प्रकरणे मिटवण्यासाठी प्रयत्न

महंमद शाहनवाज शफीउझ्मा (वय ३२), रिझवान अब्दुल हाजीअली (वय २८), अब्दुल्ला फयाज शेख (वय २८) आणि तल्हा लियाकत खान (वय ३२) अशी फरार दहशतवाद्यांची नावे आहेत. चौघे मूळचे मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. चौघांनी देशभरात दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी देशभरातील पोलिसांना त्यांची छायाचित्रे आणि माहिती पाठवण्यात आली आहे. एनआयएचे प्रमुख दिनकर गुप्ता यांनी फरार दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

आणखी वाचा-यंदा गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न! साडेसात हजार खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा

कोथरूड परिसरात १८ जुलै २०२३ रोजी दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४) व इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला साथीदार महंमद शाहनवाज पसार झाला. युनूस साकी, इम्रान खान आणि महंमद शाहनवाज यांना एनआयएनने फरार घोषित केले होते. आयसिसच्या दहशतवादी कारवायांचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रात एक गट सक्रिय होता. एनआयएच्या पथकाने झुल्फिकार अली बडोदावाला याला अटक केली होती. एटीएसने त्याला तपासासाठी मुंबई कारागृहातून ताब्यात घेतले होते. एनआयएने पुण्यातील कोंढव्यातून डॉ. अदनान अली सरकार याला अटक केली होती.

आणखी वाचा-पिंपरीतील सांडपाणी वाहिन्यांचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण

पुण्यातून अटक केलेले दहशतवादी साकी आणि इम्रान यांनी बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघे कोथरुड भागात पकडले गेले होते. दोघे मूळचे मध्यप्रदेशातील रतलामचे असून, गेल्या दीड वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास होते. राजस्थानमधील जयपूर बाँम्बस्फोट प्रकरणात दोघे फरारी होते. त्यांचा साथीदार फिरोज पठाण याचा अद्याप शोध लागलेला नाही. दहशतवादी साकी आणि इम्रान यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी एटीएसने अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा. कोंढवा) आणि सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, मूळ रा. रत्नागिरी) यांना अटक केली होती.