पुणे : चोरीच्या उद्देशाने उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात शीतल विनय ओहोळ (वय ३२) या महिलेची भर दुपारी हत्या करण्यात आली होती. आरोपी लक्ष्मण प्रभू वाघ याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ही घटना २०११ मध्ये घडली असून तब्बल ११ वर्षांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी लक्ष्मणला पुण्याच्या वडगाव मावळ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी बाजू सरकारी महिला अ‍ॅडव्होकेट पाठक यांनी मांडली. संपूर्ण तपास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी केला. 

हेही वाचा – पुण्यात बारावीतील विद्यार्थिनीने मारली कालव्यात उडी, सिंहगड रस्त्यावरील घटना; अग्निशमन दलाकडून शोध सुरू

२६ ऑगस्ट २०११ रोजी पिंपरी-चिंचवडच्या निगडी प्राधिकरण येथे शीतल विनय ओहोळ यांची अज्ञात चोरट्याने चेहऱ्यावर आणि डोक्यात वार करून हत्या केली होती. घरातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा दोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. या प्रकरणी काही दिवसांतच आरोपी लक्ष्मण प्रभू वाघला बेड्या ठोकण्यात आल्या. तो शीतल यांच्या घरासमोरील महादेव मंदिरात बसून घराची टेहळणी करत असल्याचे तपासात पुढे आले. २०११ पासून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल काल सोमवारी लागला असून, यातील मुख्य आरोपी लक्ष्मण प्रभू वाघला वडगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल अकरा वर्ष हा खटला सुरू होता. अखेर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.