पिंपरी- चिंचवडमधील तरुण यशाला गवसणी घालत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळत उत्तीर्ण झाला आहे. निलेश बचुटे अस या तरुणाने नाव आहे. परिस्थिती अत्यंत बिकट, वडील गवंडी असल्याने प्रत्येक वेळी पैसे असतील असे नव्हते. म्हणून निलेश ने कॉलेज जीवनात फी भरण्यासाठी पैसे नसल्याने लग्न समारंभात वेटर च काम करून फी भरली. आज तो पोलिस उपनिरीक्षक झाला असून त्याच्या कुटुंबाला त्याचा सार्थ अभिमान आहे. एका गवंडयाच पोरगं आज पोलिस अधिकारी झाल्याने वडील ही भावुक झाले होते.
काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही. हे नीलेशने सिध्द करून दाखविले आहे. कधीही परिस्थितीचा बाऊ न करता. येईल त्या परिस्थितीला सामोरे जात, लग्न कार्यात वेटरची नोकरी करत ध्येयाकडे वाटचाल करत निलेशने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. नीलेश बचुटे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहा च्या झोपडीत नीलेश हा आई- वडीलांसह सात लोकांसोबत राहत आहे. नीलेश हा लहानपणापासूनच हुशार असल्याने आईवडिलांची त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. नीलेश याच्या शिक्षणासाठी त्याचे आई- वडिलांनी अपार कष्ट केले आहे. अभ्यासाची आवड असलेल्या नीलेश यास निगडी येथील ओझर्डे रॅडिकल इंस्टीट्यूटचे संचालक प्रा.भूषण ओझर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
आणखी वाचा-एमपीएससीतर्फे पीएसआय २०२०ची तात्पुरती निवड यादी जाहीर; सुनील कचकड राज्यात प्रथम
नीलेशने शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले आहे. बीकॉम व एमकॉम रामकृष्ण महाविद्यालयातून झाले आहे. घरात दोन वेळ खायची वाणवा, असे दिवस काढलेल्या नीलेशने मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच; मात्र अनेक छोटी-मोठी कामे करत अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळविले आहे.
शिक्षणाच्या निमित्ताने रस्त्यावरून जात असताना शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालये पाहून त्याला मनात कुठेतरी आपणही असेच उच्च अधिकारी व्हावे, असे वाटत होते. एकाग्र मन व ठाम निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वासाच्या बळावर, जिद्द व चिकाटीने त्याने आपले शिक्षण व्यवस्थित पार पाडले आहे. अनेकवेळा कॉलेजमध्ये त्यांना पैशाची चणचण भासत असे. आई-वडिलांकडून सतत पैसे मागणे हे त्याला पटत नव्हते. त्यामुळे तो लग्नामध्ये वेटरची कामे करत असत. आईवडील कसे कबाडकष्ट करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत याची पूर्णपणे जाणीव नीलेशला होती.
प्रतिकूल आर्थिक स्थिती तुमच्या ध्येयपूर्तीसाठी अडथळा ठरू शकत नाही; फक्त बुद्धिमत्तेस आत्मविश्वास आणि संघर्षाची जोड हवी. माझ्या आई वडिलांचं मी अधिकारी व्हावं असं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहे अस नीलेश बचुटे याने सांगितले.