पुणे : कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत (ईएसआयसी) महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे. याचबरोबर पुण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा निर्णय केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ओैषधाच्या नावाखाली नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांसाठी गोव्यातील मद्याची तस्करी; पुण्यात ८२ लाखांचा मद्यसाठा जप्त

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ईएसआयसी’च्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटांची क्षमता शंभरवरून एकशेवीस करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. तसेच, अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन रुग्णालयांची उभारणीही केली जाणार आहे. ओडिशातील राऊरकेलामधील रुग्णालयात खाटांची संख्या ७५ वरून दीडशे करण्यात येणार आहे.