शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची नऊ लाख ४० हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुष्पा मैत्री (वय ३०, रा. उत्तर कसबा, सोलापूर) असे गु्न्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अनुजकुमार गुप्ता (वय ३८, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : जिल्ह्यात लम्पी आजार नियंत्रणात

मैत्री आणि गुप्ता ओळखीचे आहेत. मैत्रीने गुप्ता यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगण्यात आले होते. पैसे घेतल्यानंतर मैत्रीने तक्रारदारास परतावा दिला नाही. गुप्ता यांनी विचारणा केली. तेव्हा मैत्रीने गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहेत.

Story img Loader