Narayangaon Pune Accident : पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकने एका कारला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर ही कार पुढे थांबलेल्या एका बसला धडकली अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दरम्यान या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अपघातील मृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही म्हटले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2025
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.
मृतांच्या…
“पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अपघातात देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्षे रा. वैशखखेडे तालुका जुन्नर), विनोद केरूभाऊ रोकडे (५० वर्षे, रा. कांदळी, जुन्नर , युवराज महादेव वाव्हळ ( वय २३ वर्षे रा. १४ नंबर कांदळी, ता. जुन्नर), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७ वर्षे, रा. कांदळी, ता. जुन्नर , गीता बाबुराव गवारे (वय ४५ वर्षे १४ नंबर कांदळी ता. जुन्नर) , भाऊ रभाजी बढे (वय ६५ वर्षे रा. नगदवाडी कांदळी, ता. जुन्नर) , नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५ वर्षे रा.गडही मैदान, खेड राजगुरुनगर ) वशिफा वशिम इनामदार (वय ५ वर्षे) , मनीषा नानासाहेब पाचरणे (वय ५६ वर्षे, रा.१४ नंबर कांदळी जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे .
या दुर्घटनेमध्ये मनीषा पाचरणे या शिक्षिकेचा दुर्दैवी अंत झाला. त्या आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षिका असून त्या कांदळी येथून शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. दोन वर्षांनंतर त्या निवृत्त होणार होत्या. युवराज वाव्हळ हा तरुण नारायणगाव येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो येथील अकादमीत अभ्यास करण्यासाठी निघाला होता. या अपघातात त्याचाही मृत्यू झाला.
Nine people died in a road accident in the Narayangaon area of Pune. The accident occurred after a truck dashed a car from behind which further collided with a bus (which was stationed)…More details awaited: Pune Rural Police SP Pankaj Deshmukh
— ANI (@ANI) January 17, 2025