शहरातील एका सराफ व्यावसायिकाच्या घरातून दीड कोटी रुपयांचे दागिने लांबविणाऱ्या नोकरासह नऊ जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. चोरट्यांकडून २२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चोरट्यांनी एका सराफ व्यावसायिकाला दागिने विकल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रसिद्ध; कुलगुरू निवडीला वेग

या प्रकरणी चंदू बालाजी मेंढेवाढ (वय ३४, रा. पांडुरणा, ता. भोकर, जि. नांदेड), सारिका अप्पासाहेब सावंत (रा. काळेपडळ, हडपसर), भावना रवींद्र कोद्रे (रा. मुंढवा), जनार्दन नारा?ण कांबळे (रा. शाहूनगर, सांगली), ऋषीकेश राजाराम तोरवे (रा. जत, सांगली), दुर्गाचरण रवींद्र कोद्रे (रा. मुंढवा) यांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात आरोपींनी सराफ व्यावसायिक प्रवीण पोपट दबडे, प्रीतम पोपट दबडे, साथीदार महेश महादेव भोसले (रा. ढालगाव, ता. क‌वठे महांकाळ, जि. सांगली) यांना दागिन्यांची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून २२ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर भागात राहणाऱ्या सराफ व्यावसायिकाने फिर्याद दिली होती.

हेही वाचा- पुणे: नियोजित गृहप्रकल्पातील पाण्याच्या टाकीत पडून बालिकेचा मृत्यू; कात्रज भागातील घटना

सराफ व्यावसायिकाची लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चाैकात सराफी पेढी आहे. आरोपी चंदू मेंढेवाड सराफ व्यावसायिकाकडे गेल्या सात वर्षांपासून काम करत होता. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सराफ व्यावसायिकाने पूजेसाठी कपाटातील दागिने काढले. तेव्हा हिरेजडीत दागिने तसेच सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. एक कोटी ५९ लाख र ुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. आरोपी चंदुने बनावट चावीचा वापर करुन नकळत दागिने चोरले होते. खंडणी विरोधी पथकाने संशयावरुन त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत त्याने साथीदारांशी संगमनत करुन दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, विकास जाधव, यशवंत ओंबासे, प्रवीण ढमाळ, मधुकर तुपसौंदर, प्रमोद साेनवणे, संजय भापकर आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader