लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वानवडीतील भैरोबा नाला परिसरात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Accident
Accident : दाट धुक्याने घात केला! १२ प्रवासी असलेली क्रूझर कार कोसळळी कालव्यात; १० जण बेपत्ता
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gang created terror in Panmala area on Sinhagad Road
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
Car, ST buses hit, flyover , Nagpur,
नागपुरात उड्डाणपुलाखाली कार, एसटी बसेस परस्परांवर धडकल्या, ९ प्रवासी जखमी
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
bhandara blast 8 died
भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; आठ ठार
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई

याबाबत मयुर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भैरोबा नाला परिसरात सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे. गुरुवारी दुपारी टोळके वस्तीत शिरले. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. कोयते आणि दांडके उगारुन टोळक्याने दहशत माजविली. या भागातील मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची दांडक्याने तोडफोड करुन टोळक्याने रहिवाशांना शिवीगाळ केली.

आणखी वाचा-अमोल पालेकर यांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती

या घटनेनंतर मयूर गायकवाड घरातून बाहेर पडले. तेव्हा टोळक्याने त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जिवे मारु’, अशी धमकी देऊन टोळके पसार झाले. पसार होताना टोळक्याने या भागातील कालव्याजवळ लावलेली दुचाकी आणि रिक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत. पसार झालेल्या टोळक्याच्या शोध घेण्यात येत आहे. शहरात वाहनांची तोडफोड आणि दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मतदान संपल्यानंतर वानवडी भागात वाहन तोडफोडीची घटना घडल्याने रहिवासी दहशतीखाली आहेत.

Story img Loader