केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि विचार परिवार समन्वय बैठक घेतली. भारतीय जनता पक्षाची बारामती मोहीम यशस्वी करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेतची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

हेही वाचा- निर्मला सीतारामन यांनी पुणेकरांना दिला आश्चर्याचा धक्का; मराठीत भाषणाला सुरुवात करत म्हणाल्या, “सगळ्या पुणेकर…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने बारामती मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्याची सुरूवात गुरूवारपासून शहरी भागातील संपर्काने झाली. धनकवडी येथील छत्रपती शिवराय मंगल कार्यालयात निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे लक्षात घेऊन या बैठकीला महत्त्व देण्यात आले. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने काही सूचना केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा- मोदींच्या निर्णयांमुळे व्यवस्थेचे परिवर्तन! ; निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत प्रवेश नाही

संघाच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणालाही बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला. निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीत रणनीती ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader