अभिनेता सैफअली खान ला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल आहे. मंत्री नितेश राणेंनी देखील मत व्यक्त करत सैफ अली खानवर खरच चाकू हल्ला झाला होता. की सैफअली खान ने केवळ अभिनय (एक्टिंग) केला आहे. असा संशय नितेश राणेंनी व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना कधी हिंदू कलाकारांची चिंता वाटली नाही. यांना केवळ खान कलाकारांची चिंता असल्याचा टोला देखील दोघांना लगावला आहे. नितेश राणे हे आळंदी मध्ये बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, बांगलादेशी सैफ अली खान च्या घरात शिरला. आधी ते मुंबई च्या नाक्यावर थांबायचे ते आता घरात शिरत आहेत. कदाचित सैफ अली खान ला घेऊन जायला आले असतील. अस मिश्कीलपणे नितेश राणे म्हणाले, पुढे ते म्हणाले, आज सैफ अली खानला बघितल्यावर मलाच संशय आला, खरंच चाकू मारला की अभिनय केला. पुढे ते म्हणाले, जेव्हा कुठल्या खान ला त्रास होतो. तेव्हा हे सगळे टीव- टीव करायला लागतात. सुशांत सिंह राजपूत च काय झालं?. जितेंद्र आव्हाड तेव्हा पुढे आले नाहीत. बारामतीची ताई बाहेर नाही आली. सुप्रिया सुळे यांना सैफ अली खान ची चिंता आहे. शाहरुख खान च्या मुलाची चिंता आहे. नवाब मलिक ची चिंता आहे. कधी कुठल्या हिंदू कलाकारांची चिंता करताना यांना ऐकलं आहे का?. वीर सावरकरांनी सांगितलं आहे. मुस्लिमांपेक्षा हिंदूच- हिंदू चा शत्रू आहे. असे देखील राणे म्हणाले आहेत.

….त्यांना भारताला इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे

कधी -कधी असं वाटतं. आपण एवढी टोकाची भूमिका का घ्यायची?. कशाला वातावरण खराब करायचं. परंतु, आजूबाजूचं वातावरण पाहिल्यानंतर आपण जागरूक राहिलं पाहिजे असं वाटतं. आपल्या हक्काच्या धर्मस्थळांवर वक्फ बोर्डाने ताबा टाकायला सुरुवात केली आहे. पिंपरी- चिंचवड च उदाहरण घ्या. पिंपरी- चिंचवड शहरात अनेक रोहिंगे आणि बांगलादेश हे मुस्लिम नोकरीसाठी आलेत. ते देखील हळूहळू मस्जिद उभा करतायेत. हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. यांना भारताला इस्लाम राष्ट्र बनवायच आहे. हे मी खरं सांगत आहे. मी मत मिळवण्यासाठी किंवा दंगल भडकवण्यासाठी बोलत नाही. असे देखील राणे यांनी स्पष्ट केल आहे.

Story img Loader