पिंपरी : आयआयटी, अभियंता महाविद्यालय, विद्यापीठात भाषण देण्यासाठी जातो. तेव्हा मला खूप संकोच वाटतो. कारण मी इंजिनिअरिंगसाठी अपात्र ठरलो. तर, मी काय भाषण करणार आहे. आता मला सहा डिलीट मिळाल्या असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकुर्डीत बोलताना गडकरी म्हणाले, युट्युबवरून खूप फायदा होत आहे. मलाही फायदा होत आहे. मी कधीच विचार करून भाषण करत नाही. मी जास्त विद्वान व्यक्तीही नाही. मला सहावेळा डिलीट (डॉक्टरेट) मिळाली आहे. शाळेत असताना १९७५ मध्ये मी आणीबाणी विरोधात काम करत होतो. मला विज्ञानामध्ये ५२ गुण मिळाले होते. माझी इच्छा अभियंता होण्याची होती. पण मला ४९.२६ टक्के मिळाले होते. त्यामुळे मी अभियंता (इंजिनिअरिंग) महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अपात्र ठरलो.

आता मी आयआयटी, अभियंता महाविद्यालय, विद्यापीठात भाषण देण्यासाठी जातो. तेव्हा मला खूप संकोच वाटतो. कारण, मी इंजिनिअरिंगसाठी अपात्र ठरलो. तर, मी काय भाषण करणार आहे. आता मला सहा डिलीट मिळाल्या आहेत. चार महाराष्ट्राच्या आणि दोन तमिळनाडूच्या आहेत. पण, मी कधी डॉक्टर लिहीत नाही. इंजिनिअरिंगसाठी अपात्र ठरलो असून डॉक्टर कसे लावू याचा संकोच वाटतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज यांना कोणती डिलीट मिळाली नव्हती. पण, त्यांचे विचार अबाधित आहेत, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari said he feels hesitant when he goes to an iit university to give a speech pune print news ggy 03 amy