मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये लोहमार्गाच्या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. निजामाबाद-पुणे, दौंड-भुसावळ या गाड्या १२ जानेवारीपासून पुढील काही दिवस रद्द करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरील काही काळा बदललेल्या मार्गाने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा- ‘कोयता गँग विरोधात पुणे पोलिसांचे विशेष पथक नेमले’; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

Four special trains will run from Nagpur for Kumbh Mela
नागपूरहून कुंभमेळासाठी चार विशेष गाड्या धावणार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
tiger attack speeding bike Pimpalgaon Lakhni Taluka bhandara two injured
भंडारा : रात्रीचा थरार! वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर अचानक वाघाने घेतली झेप…
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Nagpur to Sikandarbad Vande Bharat Express coaches to be reduced
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद,डबे कमी होणार
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…

कोपरगाव ते कान्हेगाव या स्थानकांदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाशी संबंधित कामे केली जाणार आहेत. परिणामी २४ जानेवारीपर्यंत दौंड-निजामुद्दीन गाडी रद्द राहणार आहे. निजामुद्दीन-पुणे ही गाडी २६ जानेवारीपर्यंत, तर १२ आणि १९ जानेवारीला दौंड-भुसावळ-दौंड मेमू गाडीही रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २१ ते २३ जानेवारी या कालावधीत कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि २३ ते १५ जानेवारी या कालावधीत गोंदिया-कोल्हापूर ही गाडीही रद्द करण्यात येणार आहे.

हेही वाचा- दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसहभागातून कृती कार्यक्रम, राज्य मंडळातर्फे पहिल्यांदाच उपक्रम

पुणे-अमरावती ही १८ जानेवारीला धावणारी गाडी, १९ जानेवारीला सुटणारी पुणे-नागपूर, अमरावती-पुणे, २० जानेवारीला पुणे-आजनी-पुणे नागपूर, २१ जानेवारीला पुणे-अजनी आणि २२ जानेवारीची अजनी-पुणे या सर्व गाड्या पुणे, लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड या बदललेल्या मार्गाने धावतील. २२ जानेवारीला हावडा-पुणे, हटिया-पुणे या गाड्या नागपूर, बल्लारशाहा-काजीपेट, सिकंदराबद, दौंड, पुणे या मार्गाने धावतील. २३ जानेवारीला हजरत निजामुद्दीन-मैसूर एक्स्प्रेस पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे या मार्गाने धावेल.

Story img Loader