राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार ७५ हजार ८४१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.पालकांचे वार्षिक साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आणि अनुदानित शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार या प्रमाणे बारावीपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. यंदा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ डिसेंबरला एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती.
हेही वाचा >>>पुणे : शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर संभाजी ब्रिगेडची माघार
१ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सविस्तर निकाल https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या यादीतील विद्यार्थ्यांच्या नाव किंवा जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदींमध्ये दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची यादी यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.