पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्या शाळेच्या इमारतीतील चौथ्या आणि पाचवे मजले बंदी घातलेल्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ताब्यात असल्याने दोन मजले एनआयएकडून लाखबंद (सील) करण्यात आले आहेत.
एनआयएचे दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी आणि पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत चर्चा झाली आहे. ब्ल्यू बेल्स शाळेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. संबंधित शाळेची चौकशी किंवा तपासदेखील करण्यात येत नाही. संबंधित शाळा के. झेड. इमारतीत आहे. या इमारतीतीत चौथ्या आणि पाचव्या मजल्यांचा ताबा पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडे (पीएफआय) होता. कोंढव्यातील के. झेड. इमारत ब्ल्यू बेल्स शाळेची इमारत म्हणून ओळखली जाते. पोलीस किंवा एनआयकडून शाळेची चौकशी करण्यात आली नाही, तसेच शाळेच्या खोल्या किंवा कार्यालयदेखील सील करण्यात आले नाही, असे पुणे पोलिसांनी कळविले आहे.
पीएफआय वापरत असलेले दोन मजले सील करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.