पुणे-लोणावळा लोकलच्या दैनंदिन तिकिटाच्या दरामध्ये कोणतेही बदल न झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, मात्र पासच्या दरामध्ये वाढ झाल्याने त्याचा फटका अनेक प्रवाशांना बसणार आहे. पुणे-लोणावळा लोकलच्या पासचे नवे दर गुरुवारी मध्य रेल्वेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
लोणावळा लोकलसाठी पुणे ते चिंचवडपर्यंत पूर्वीप्रमाणेच पाच रुपये तिकीट आकारणी होणार आहे. त्यापुढे देहूरोड ते कान्हे स्थानकापर्यंत १० रुपये, तर कामशेत ते लोणावळ्यापर्यंत १५ रुपये तिकिटाचे दर असणार आहेत. या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, द्वितीय वर्गाच्या मासिक पासच्या दरामध्ये १५ ते ३५ रुपये वाढ करण्यात आली आहे. प्रथम श्रेणीच्या मासिक पासमध्ये ४० ते १३० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मासिक पासधारकांना त्याचा फटका बसणार आहे.
द्वितीय वर्गातील मासिक पाससाठी पुणे स्थानकापासून आकुर्डीपर्यंत ८५ रुपयांऐवजी १०० रुपये आकारणी केली जाणार आहे. कान्हे स्थानकापर्यंत १६० रुपयांऐवजी १८५, तर लोणावळ्यापर्यंतचा मासिक पास २३५ ऐवजी २७० रुपयांना मिळणार आहे. प्रथम वर्गाच्या पाससाठी पुणे ते दापोडी स्थानकापर्यंत २८५ ऐवजी ३२५ रुपये आकारले जाणार आहेत. पिंपरी स्थानकापर्यंत ३५५ रुपयांऐवजी ४०५ रुपये, आकुर्डी स्थानकापर्यंत ४२० रुपयांऐवजी ४८० रुपये आकारणी केली जाईल. देहूरोड स्थानकापर्यंत ४९५ ऐवजी ५६५ रुपये, बेगडेवाडी स्थानकापर्यंत ५०० ऐवजी ५७५ रुपये, तळेगाव स्थानकापर्यंत ५७० ऐवजी ६५५ रुपये, वडगाव स्थानकापर्यंत ६३५ ऐवजी ७२५ रुपये, कान्हे स्थानकापर्यंत ७०५ ऐवजी ८०५ रुपये, कामशेत स्थानकापर्यंत ७७० ऐवजी ८८० रुपये, मळवलीपर्यंत ९०५ ऐवजी १,०३५ रुपये आकारणी केली जाईल. लोणावळा स्थानकापर्यंत प्रथम श्रेणीच्या पासचा दर ९१५ ऐवजी १,०४५ रुपये करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा