पिंपरी-चिंचवडमधील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण न केल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड या ठिकाणी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शासकीय वसतिगृहामध्ये ध्वजारोहण केलं नाही, म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल विशाल घोरपडे यांचं निलंबन करण्यात यावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा – पुणे: मैत्रिणीला खूश करण्यासाठी कायपण! दिवसा शेफ, रात्री…
हेही वाचा – पिंपरी: कोयता गॅंगचा मॉलवर दरोड्याचा प्रयत्न फसला
यावर गृहपाल विशाल घोरपडे यांनी त्यांची बाजू मांडली आहे. आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह नुकतेच नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आल आहे. त्या ठिकाणी ध्वजस्तंभ नाही. म्हणून, ध्वजारोहण केलं नाही. असं कारण त्यांनी पुढे केले आहे. नियम डावलून ध्वजारोहण केलं असतं तर तो ध्वजाचा अपमान झाला असता, म्हणून आम्ही ध्वजारोहण केलं नाही असंदेखील त्यांनी म्हटले आहे.