पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली तिसर्‍यांदा केंद्रात सत्ता आली आहे. त्या सरकाराचे पहिलेच अधिवेशन होत आहे. मात्र त्यापूर्वीच सामानाच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणालेत की, जेडीयू आणि टीडीपी पक्षातील खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्या चर्चेबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत माझ्या काही ऐकण्यात नाही किंवा आमच्यासोबत अशी कोणी चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – आळंदी: इंद्रायणी पुन्हा फेसाळली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी दिलं होतं ‘हे’ आश्वासन

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका

हेही वाचा – पालखी सोहळा, वाहतूक बदल, पर्यायी मार्गांची माहिती घ्या एका ‘क्लिक’वर…पुणे पोलिसांकडून यंदा ‘गुगल मॅप’चा वापर

उद्यापासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिले अधिवेशन असून त्यामुळे आता काही कळणार नाही. दुसऱ्या सत्रापर्यंत हा सगळा अंदाज येईल. त्यामुळे आता स्पष्ट सांगायचे झाले तर कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटत आहे. आता काही गडबड झाली तर निवडणुकीला समोर जाव लागेल. निवडणुकीला समोर जायचे म्हटलं तर तुम्हाला ऊन, वारा, पावसात जसा त्रास होतो तसाच आम्हालादेखील होतो. त्यामुळे नको रे बाबा ही निवडणूक, अशी आमची सर्वांची भावना असल्याचे शरद पवार यांनी म्हणताच उपस्थित पत्रकारांमध्ये हशा पिकला.

Story img Loader