पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली तिसर्यांदा केंद्रात सत्ता आली आहे. त्या सरकाराचे पहिलेच अधिवेशन होत आहे. मात्र त्यापूर्वीच सामानाच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणालेत की, जेडीयू आणि टीडीपी पक्षातील खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्या चर्चेबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत माझ्या काही ऐकण्यात नाही किंवा आमच्यासोबत अशी कोणी चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले.
उद्यापासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिले अधिवेशन असून त्यामुळे आता काही कळणार नाही. दुसऱ्या सत्रापर्यंत हा सगळा अंदाज येईल. त्यामुळे आता स्पष्ट सांगायचे झाले तर कोणत्याही खासदाराला पुन्हा निवडणुका नको वाटत आहे. आता काही गडबड झाली तर निवडणुकीला समोर जाव लागेल. निवडणुकीला समोर जायचे म्हटलं तर तुम्हाला ऊन, वारा, पावसात जसा त्रास होतो तसाच आम्हालादेखील होतो. त्यामुळे नको रे बाबा ही निवडणूक, अशी आमची सर्वांची भावना असल्याचे शरद पवार यांनी म्हणताच उपस्थित पत्रकारांमध्ये हशा पिकला.
© The Indian Express (P) Ltd