पुणे जिल्ह्य़ातील निवडणुकीत मतदारांनी ‘वरील उमेदवारांपैकी नाही’ म्हणजेच ‘नोटा’ चा मोठय़ा प्रमाणात वापर केला आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. या ठिकाणी जिल्ह्य़ात सर्वात जास्त चार हजार चारशे ३५ जणांनी नोटाला मतदान केल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणूक पंचरंगी झाली. मात्र, उमेदवारांना मिळालेली मते पाहता प्रत्येत मतदार संघात पाच क्रमांकाची मते ही नोटाला मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार हे दोन हजार ३३५ मतांनी विजयी झाले आहेत. मात्र, त्यांना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्तमते ही नोटाला मिळाली आहेत. त्यानंतर चिंचवड मतदार संघात तीन हजार दोनशे मते नोटाला मिळाली आहेत. मतदारसंघनिहाय नोटाला मिळालेली मते- बारामती १५६२, दौंड १४६४, हडपसर १६१०, जुन्नर १७५६, कसबा १३७१, कोथरुड १५८३, खडकवासला २१०८, मावळ २००६, पिंपरी ४४३५, पुणे कॅन्टोमेन्ट १८१८, पुरंदर १२०८, शिरुर १३४९, शिवाजीनगर १८४२, वडगावशेरी १७५४, पर्वती १७७४, चिंचवड २२०२,भोसरी १३६८, इंदापूर ४३७, खेड-आळंदी ११०६, भोर १७०४, आंबेगाव १३००

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा