मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. यावरून शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मनसेला टोला लगावला आहे. मनसेच्या याअगोदर देखील अनेकांनी भेटी घेतल्या आहेत, बैठका झाल्यात पण त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं गेलं आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे ती कोणी तोडू शकणार नाही अस देखील त्यांनी स्पष्ट केल आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी शिवसेना आमदार सचिन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते. नीलम गोऱ्हे आणि सचिन अहिर यांच्या हस्ते उद्धव श्री पुरस्काराच वितरण करण्यात आलं.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मनसेच्या बरोबर अनेकांनी बैठका घेतल्या, त्याची बातमी मोठी करून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आहे. विजयादशमी चा जो दिवस आहे. ज्याला जस योग्य वाटतं तस करू शकतात. परंतु, एकच मैदान आणि एकच भाषण ही जी परंपरा आहे. ती शिवसेनेची परंपरा आहे, कोणी कितीही म्हटलं तरी तोडू शकत नाहीत. ती पिढ्यानपिढ्या उभी केलेली आहे. त्या प्रमाणे शिवतीर्थावर सभा होईल. हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. असा टोला त्यांनी मनसे ला लगावलेला आहे.पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना नाव ठेवत होते. आता टीका करतात. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्या शिवाय माध्यम प्रसिद्धी देत नाहीत. त्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याच व्यसन लागलं आहे. पुढे त्या म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वच माणसपुत्र आहेत. मानसपुत्र भरपूर आहेत. त्या मानस पुत्रांचं स्वतःच वागणं काय असणार आहे, हा खरा प्रश्न आहे. असा खोचक सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला आहे. 

त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील!

गेली २२ वर्ष झालं उद्धव श्री हा पुरस्कार देण्यात येतोय. पुढच्या ३ वर्षात आपण २५ वा पुरस्कार वितरण सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होवो, त्या वेळी ते मुख्यमंत्री किंवा देशाच्या महत्वाच्या पदावर बसलेले असावेत, अस वक्तव्य आमदार सचिन अहिर यांनी केलं आहे.

Story img Loader