एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे संपाच्या पार्श्वभूमीवर या निवडीबद्दल वेगळीच माहिती माहिती अधिकारातंर्गत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.
गजेंद्र चौहान यांच्या निवडीचे केंद्र सरकारने स्पष्टपणे समर्थन केले आहे. त्याचबरोबर आता हा निर्णय बदलता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निवडीसंदर्भात माहिती देताना केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी म्हटले होते की, अनेक दिग्गज अभिनेत्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे सरकारकडे अत्यंत मर्यादित कलाकारांची यादीच उपलब्ध होती. त्यामुळे त्यातून सरकारला गजेंद्र चौहान यांच्या नावाची निवड करावी लागली. मात्र, माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी कोणत्याच कलाकाराने केंद्र सरकारकडे अर्ज केला नव्हता. एकही कलाकार हे पद स्वीकारण्यास उच्छूक नव्हते, हे उघड झाले आहे. एफटीआयआय संस्थेचे नियामक मंडळाचे प्रमुख म्हणून केंद्र सरकार काम करते. त्यामुळे या संस्थेवर अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करायचे, याचा निर्णयही ते घेतात, असेही माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोणकोणत्या कलाकारांनी या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला, याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी कोणीच अर्ज केला नव्हता – माहिती अधिकारातून स्पष्ट
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे संपाच्या पार्श्वभूमीवर या निवडीबद्दल वेगळीच माहिती माहिती अधिकारातंर्गत 'द इंडियन एक्स्प्रेस'ला मिळाली आहे.
First published on: 13-07-2015 at 11:48 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one else approached for ftii post rti